सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा….

भारताच्या आणि समाज जीवनाच्या जडणघडणीत पत्रकारिता मोठा वाटा असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले. पत्रकार दिनानिमित्त सन्मान सोहळा संपन्न.
चौकातील आयएमए हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी आ. दिलीप माने, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, ज्येष्ठ पत्रकार तथा सुराज्यचे संपादक राकेश टोळये, सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत, जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना दिलीप माने यांनी सध्याच्या धावपळीच्या युगात पत्रकारितेमुळे प्रत्येक गोष्ट तात्काळ करण्यास मदत होत असल्याचे सांगितले. सोलापूरला पत्रकारितेचा मोठा इतिहास असून या पत्रकारितेमुळे विकासाला चालना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार संघाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राकेश टोळ्ये, सिद्धाराम पाटील, मनीष केत यांचीही भाषणे झाली. यावेळी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता काजळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रुती माने – गांधी यांनी मानले.
या कार्यक्रमास पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia