सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

उन्हापासून बचावासाठी माथाडी कामगारांना अत्यावश्यक किट…

ज्ञानज्योती फाउंडेशन व श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानचा उपक्रम...

ज्ञानज्योती फाउंडेशन (बेळगावी) व श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानच्या वतीने रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड येथील 100 माथाडी कामगारांना दैनंदिन जीवनावश्यक किट देण्यात आले.
अडत व्यापारी सिद्धाराम उमदी, ज्ञानज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर शिरशी, बाजार समिती माजी संचालक शिवानंद पुजारी, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, अब्बास शेख, शिरीष गवसने, रोहित लिगाडे, संगमेश्वर बिराजदार यांच्या हस्ते सदर किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित कामगारांना आरोग्य स्वच्छता मार्गदर्शन करण्यात आले. कामगारांना देण्यात आलेल्या किटमध्ये एनर्जी सॉफ्ट ड्रिंक, ग्लुकोज पावडर, दंत क्रिम, खोबरेल तेल, हँडवॉश बॉटल असा 250 रुपये किमतीच्या साहित्याचा समावेश आहे.
यावेळी विजयकुमार बिराजदार, संतोष कापसे, प्रकाश तडकल, प्रशांत लिगाडे, शिवलिंग बणजगोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फोटो ओळी : ज्ञानज्योती फाउंडेशन व श्री सिद्धयोगी प्रतिष्ठानतर्फे माथाडी कामगारांना जीवनावश्यक किट देताना सिद्धाराम उमदी, मयूर शिरशी, शिवानंद पुजारी, विजयकुमार बिराजदार, अब्बास शेख, शिरीष गवसने, रोहित लिगाडे, संगमेश्वर बिराजदार

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel