धक्कादायक:सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या

मुलगी झाल्याने विवाहितेला त्रासाला सुरूवात
सोलापुरात हगवणे प्रकरणाची पुन्नरावृत्ती, 3 वर्षांच्या चिमुकल्या वैष्णवीला सोडून आईने जीव दिला
सोलापूर:सोलापुरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथे सासरच्या जाचाला कंटाळून आशाराणी भोसले विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विवाहितेने आयुष्य संपवल्याची घटना समोर आल्याने सोलापुरात संताप व्यक्त केला जात आहे. आशा भोसले प्रकरणात देखील चारचाकी वाहन आणि पैशाच्या हव्यासासाठीच सासरकडच्यांनी सुनेचा छळ केल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील विवाहितेच्या आत्महत्त्या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
*वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती-
चार चाकी वाहन घेण्याकरिता व इतर खर्चासाठी माहेरवरून पैसे घेऊन ये तुला नीट स्वयंपाक करता येत नाही. तू नवऱ्याची इज्जत करत नाही, असे म्हणून वारंवार मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याप्रकरणी नवरा पवन भोसले, सासू अलका भोसले व सासरा बलभीम भोसले यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिंचोलीकाटी औद्योगिक वसाहतीमधील आशा पवन भोसले (वय २२) या विवाहित महिलेचे नाव आहे.
*नातेवाईकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल-
आशा भोसले याने राहत्या घरातील दरवाज्याच्या चौकटीला साडी बांधून गळफास घेतल्याची खबर मयताची बहीण अंजूबाई पांडुरंग शिंदे (वय ४७, रा. कर्देहळ्ळी) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रारंभी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत आशा भोसले यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.नातेवाईकांच्या सांगण्यावरुन, आशा भोसले यांना त्रास दिला जात होता. तिच्याकडे वारंवार पैशीची मागणी केली जात होती, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शिवाय आशा भोसले यांच्या वडिलांनाही आत्महत्या नसून तिचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे.
*आशा भोसले याने पवन सोबत प्रेमविवाह केला होता-
उशारणी हिचा ज्ञानेश्वर भोसले याच्याशी 2019 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर त्याचा लहान भाऊ पवन भोसले याने धाकटी मुलगी आशाराणी हिला पळवून नेलं आणि प्रेमाविवाह केला. मात्र मुलगी झाल्यापासून तीचा छळ सुरूच होता. अनेक वेळा तिच्या कुटुंबियांना व्हिडीओ कॉल करत आशाराणी हिला मारहाण केली जात होती. आशाराणी माहेरी निघून आल्यावर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर आम्ह मुलीला नांदायला पाठवलेलं होतं. मंगळवारी तिने टोकाचा पाऊल उचललं. तिला तीन वर्षांची वैष्णवी नावाची चिमुकली आहे.



