सोलापूर राजकीय

वधूवर सूचक केंद्रे काळाची गरज : श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी 

काशीपीठ वधूवर सूचक केंद्र कार्यालयाचे उद्घाटन संपन्न 

सोलापूर : सध्या विवाहाचे वय होऊन सुद्धा वधूवरांचे विवाह जुळणे ही कठीण समस्या बनली आहे. सुयोग्य वधूवरांचे विवाह होणे हे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. त्यात भर म्हणजे काही वधूवर सूचक वधूवरांच्या पालकांची पिळवणूक करीत आहेत. त्यातून सुटका होण्यासाठी विश्वासार्ह वधूवर सूचक केंद्रे सध्याच्या काळाची गरज बनली आहेत असे प्रतिपादन नागणसूर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी यांनी केले.

श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान जंगमवाडी मठ वाराणसी यांच्यावतीने काशीपीठ वधूवर सूचक केंद्र कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील, वेदमूर्ती बसवराज शास्त्री-हिरेमठ उपस्थित होते.

श्री जगद्गुरू विश्वाराध्य जनकल्याण प्रतिष्ठान जंगमवाडी मठ वाराणसी यांच्यावतीने भक्तांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काशीपीठ वधूवर सूचक केंद्र चालवले जाते. त्याच्या सोलापुरातील कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. श्रीकाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजीनी सुरू केलेला हा उपक्रम निवृत्त पोलीस हवालदार कै. सिद्रामप्पा बिराजदार यांनी सांभाळला होता असे सिद्धया स्वामी-हिरेमठ यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.

याप्रसंगी गुड्डापूर दानम्मा देवी ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, भुसार अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश चिक्कळी, वीरशैव मराठी साहित्य अभ्यासक डॉ. अनिल सर्जे, श्रीकाशीपीठ शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर, बाबूराव मैंदर्गीकर, अडत व्यापारी बाळासाहेब देशमुख, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे आदींची उपस्थिती होती.

कुंभार वेस येथील श्री रेवणसिद्धाश्रम मठ (कडगंची मठ) येथे हे कार्यालय असून त्याची जबाबदारी शोभा स्वामी मो. नं. 9022581289, 7720838556 यांच्यावर प्रमुख कार्यवाह म्हणून तर त्यांना सहाय्यक म्हणून सुनिता स्वामी (पुणे) व श्रद्धा चौकवाले (पुणे) हे सहकार्य करणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने हे कार्य सुरू राहणार आहे. यासाठी फक्त एकदाच १ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी काशीपीठाच्या अधिकृत बँक खात्यात भरावी लागणार आहे. वीरशैव धर्मातील सर्व पोटजातीतील विवाह इच्छुक वधूवर आणि त्यांच्या पालकांनी वरील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शोभा स्वामी यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, सूत्रसंचालन राजेंद्र बलसुरे यांनी तर आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिद्रामय्या हिरेमठ, गुरुशांत रामपुरे, ओंकार हिरेमठ, गणेश हिरेमठ, अनिल कासे, शीला स्वामी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login