नोबल सोशल वेल्फेअर असोशियन अक्कलकोट इज्तेमाई शादियां ११ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न…

अक्कलकोट : (प्रतिनिधी) नोबल सोशल वेल्फेअर असोशियन अक्कलकोट चा दरवर्षीप्रमाणे सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात संपन्न झाला आहे. दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ठीक ७:०० वाजता हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता, या इज्तेमाई शादियां सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ११ वधू-वरांचा लग्न लावण्यात आले या विवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात
प्रमुख उपस्थिती,हजरत मस्तुर शाह कादरी,महेश हिडोळे,ननु कोरबु,मुत्तु खेडगी,सद्दाम शेरीकर,रजाक सय्यद,मोशीन बागवान(एम.न) व
इरफान दावन्ना,सैपन पठान,फारूक बबर्ची, बुडन तांबोळी, गुलाम दाता बळोरगी,मुबारक कोरबु,आझम शेखजी(सामाजिक कार्यकर्ता), मुजमील मुजावर(हैद्रा),रफिक पठाण, मुरतुज बाजे, सोहेल फरास(सामाजिक कार्यकर्ता), रशीद खिस्तके, समीर शेख,आलम कोरबु,भया नायकवाडी, नुरद्दिन सोलापूरे,इस्माईल आळंद,सलीम गावंडी आदीसह उपस्थित होते.
सामुदायिक विवाह सोहळ्यास आवर्जून राहिल्याबद्दल नोबल सोशल वेल्फेअर असोशियन चे संस्थापक अध्यक्ष हुसेन बळोरगी व इरफान दावणा यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाजी अजीज शेख सर यांनी केले अशी माहिती सामाजिक कार्यकर्ता सोहेल फरास यांनी दिली.