सोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबीरात 85 जणांचे रक्तदान…

सोलापूर काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात 85 जणांनी सहभाग घेतला.

रक्तदान शिबीराचे उदघाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार सर,सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे,माजी महापौर संजय हेमगड्डी,आरिफ शेख,सुशिलाताई आबुटे, बाबा मिस्त्री,नगरसेवक नरसिंह आसादे,आयोजक गणेश डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजक सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले सुशिलकुमार शिंदे साहेब यांनी सोलापूरचे नाव संपूर्ण देशभरात गाजवले आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे.सोलापूरचा विकासामध्ये महत्वाचे देशात पहिल्यांदाच स्वतंत्र जिल्हासाठी सोलापूर विद्यापीठ,एन टी पी सी,उजनी दुहेरी पाईप लाईन, डाळिंब संशोधन केंद्र, राज्याला सोलापूरला जोडणारे मोठे रस्ते,पावरग्रेड इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट,सोलापूर सायन्स सेंटर,कुंभारी मेडीकल कॉलेज,बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे विविध विकासकामे करून सोलापूरच्या भविष्याचा विचार फक्त शिंदे साहेबांनी केला. वाढदिवसानिमित्त साहेबांना उंदड आयुष्य लाभो हिच आई जगदंबा चरणी प्रार्थना.

यावेळी सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे,सोशल मिडीया प्रमुख तिरूपती परकीपंडला,सिध्दाराम चाकोते,शकील मौलवी,पशुपती माशाळ,हाजीमलंग नदाफ,एन के क्षीरसागर, अंबादास गुत्तीकोंडा, नुरअहमद नालवार, हेमा चिंचोळकर,कमरूनिस्सा बागवान,ज्योती गायकवाड,मुमताज तांबोळी,रेखा बिनेकर,छाया हिरवटे,प्रवीण जाधव, योगेश रणधीरे, विवेक कन्ना,सचिन पवार,धीरज खंदारे,अनंत म्हेत्रे,महेश लोंढे,शशीकात शेळके,सोपान मिसाळ,यासीन शेख,अस्लम शेख,प्रतीक शिंगे,चंद्रकांत नाईक,ईलाई हलगूर,सुभाष वाघमारे,मलीक नदाफ,आकाश नाईक,युवराज दोडमनी,दिनेश डोंगरे,आकाश जाभंळे,अजीत सिरसट,सर्जेराव फंड,रितेश जाधव,सागर भिसे,विकी आलाट,राहूल काटे,प्रवीण चव्हाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel