महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा जिंकणार? नाना पाटेकरनी आकडाच सांगितला

मुंबई, 25 डिसेंबर : लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरूवात झाली आहे. सगळेच राजकीय पक्ष जगातल्या सगळ्यात मोठ्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला घवघवित यश मिळालं, त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठीचा त्यांचा आत्मविश्वास आणखी बळावला आहे.

दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबतचं भाकीत वर्तवलं आहे. भाजपला मोठ्याप्रमाणावर यश मिळेल, असं नाना पाटेकर यांना वाटत आहे. ‘मोठ्या प्रमाणावर भाजप निवडून येईल, तुमच्याकडे पर्याय नाही आणि एवढं चांगलं काम होत आहे. 350-375 पर्यंत गेले तरी मला आश्चर्य वाटणार नाही’, असं वक्तव्य नाना पाटेकर यांनी केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दलही नाना पाटेकर यांनी समाधान व्यक्त केलं आहे. नाना पाटेकर यांचं हे भाकीत खरं ठरलं, तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅट्रिक करतील.
भारताची लोकसभा निवडणूक एप्रिल-मे महिन्यादरम्यान होण्याची शक्यता आहे, तर फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागू शकते. निवडणूक आयोगाने अजूनही लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केलेली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. भाजपला तब्बल 303 जागांवर यश मिळालं होतं, तर काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia