सोलापूर बातमीशैक्षणिकसोलापूर सामाजिक

भीमा कोरेगाव शौर्य दिनी सामाजिक कार्यकर्त्या सुशिलादेवी भालशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत शाळा व शिक्षकांचा सत्कार

भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या सुशिलादेवी अण्णासाहेब भालशंकर यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील निवडक गुणवंत शाळा, गुणवंत शिक्षक- कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अँड. संजीव सदाफुले व वालचंद महाविद्यालयातील निवृत्त हिंदी विभाग प्रमुख डॉ. मारुती शिंदे, ग्रामीण बँकेचे निवृत्त व्यवस्थापक अशोक साबळे हे होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.

यावेळी बोलताना ऍड सदाफुले म्हणाले, सुशिलादेवी भालशंकर यांनी मोठा संघर्ष करून स्वतःची आणि समाजाची मुले घडवली, ती मोठी केली. त्यांच्यामुळे अण्णासाहेब भालशंकर सुद्धा घडले.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. मारुती शिंदे म्हणाले, सुशिलादेवी भालशंकर यांच्यामुळेच अण्णासाहेब भालशंकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य उभे राहिले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना अण्णासाहेब भालशंकर म्हणाले, संघर्ष लढ्यात माझ्याबरोबर नव्हे तर माझ्या पुढे सुशिलादेवी या होत्या. नवीन पिढीला त्यांचा संघर्ष माहिती व्हावा म्हणून जिल्ह्यातील गुणवंत शाळा तसेच गुणवंत शिक्षक व कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला आहे.
यामध्ये गुणवंत शाळा म्हणून संघमित्रा माध्यमिक विद्यालय कुर्डुवाडी ता. माढा, मातोश्री माध्यमिक विद्यालय म्हैसगाव, ता. माढा, विश्वभूषण विद्यालय सोलापूर, राष्ट्रसंत प्राथमिक शाळा सोलापूर यांची तर गुणवंत शिक्षिक म्हणून निर्मला लक्ष्मण मौळे ( सरस्वती बाबुराव चाकोते प्रश्नाला, सोलापूर) आणि गुणवंत कर्मचारी म्हणून महिबूब तांबोळी ( उस्मानिया उर्दू हायस्कूल होटगी) यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर ( खंडागळे )यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले तर रवि देवकर यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजीनाथ लोखंडे, मिलिंद भालशंकर, सुशीलचंद्र भालशंकर, अक्षय किरात, वैभव कांबळे, सुमित चलवादी, कपिल क्षीरसागर ,विष्णू लादे, माधव माने, महेश मेंडके, मनोहर कुंभार आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia