सोलापूर राजकीयमहाराष्ट्रराजकीयसोलापूर बातमी

काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे… माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे

लोकसभेचा गड सर्वांनी मिळून जिंकला. त्याचप्रमाणे आता आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा गड जिंकण्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली.

काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत चांगले काम केल्यामुळे हा विजयी मिळवता आला. त्या बद्दल सर्वांचे आभार.
कार्याध्यक्ष अँड.नंदकुमार पवार मानले.
सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे संपन्न झाली. बैठकीत सर्व प्रथम सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणितीताई शिंदे मोठ्या मताधिकाने विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
सदर बैठकीत मतदार नविन नाव नोंदणी अभियान, सरकार विरोध विरोधी मागील तीन महिन्यातील व पुढे होणाऱ्या मोर्चा, आंदोलनाबाबत आढावा व पुढील नियोजन, सोशल मीडिया, बूथ कमिटी आढावा व BLA बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रकाश पाटील, बाबा मिस्त्री, बाबासाहेब शिरसागर, शालिवाहन माने -देशमुख, गुरुनाथ म्हेत्रे, विजयकुमार हस्तुरे, मल्लिकार्जुन पाटील, लक्ष्मण भोसले ,हरीश पाटील, राजेश पवार, रमेश हसापूरे, गजेंद्र खरात, राधाकृष्ण पाटील, अप्पू शेख, मोतीराम चव्हाण, प्रा. सिद्राम सलवदे, किशोर अशोक देवकते, सुरेश हावळे, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार म्हणाले सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे दोन्ही जागेवर विजयी मिळवता आला. आता पुढील काळात सुध्दा विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. यासाठी महाविकास आघाडीतील सर्वांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगले काम करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सत्ता येणेसाठी कामाला लागावे. भाजपा विषयी लोकांमध्ये नाराजी आहे. यामुळे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे.असे ते म्हणाले.
बैठकीचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सातलिंग शटगार यांनी केले.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष शालिवाहन माने- देशमुख, हरीश पाटील, राजेश पवार, तानाजी जगदाळे, आप्पासाहेब पुजारी, जे. टी. जाधव, सुरेश हावळे, सौदागर जाधव, निवेदिता आरगडे, चिदानंद चिट्टे,मोतीराम चव्हाण, बिलाल शेख राधाकृष्ण पाटील, रमेश हसापुरे, प्रा. सिद्राम सलवदे, किशोर पवार, अशोक देवकते, फर्जना बागवान, अप्पू शेख, भैरवनाथ भोसले आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी सभापती बाबासाहेब शिरसागर, मल्लिकार्जुन पाटील, माजी उपसभापती संजय गायकवाड , सुदर्शन अवताडे,वसीमभाई पठाण,तालुका अध्यक्ष संजय पाटील माढा, अमर सूर्यवंशी, सतीश शिंदे, धर्मराज पुजारी,विजयकुमार हत्तुरे, राहुल पाटील, सचिन खैरे -पाटील, जहीर मनेर, रमजान नदाफ,सचिन गुंड ,राजू गायकवाड, श्रीशैल रणखांबे,आदित्य फत्तेपुरकर ,सिद्धार्थ गायकवाड, रावसाहेब होनमाने, लक्ष्मण भोसले, किरण सुर्वे, कृष्णदेव वाघमोडे ,महादेव जाधव, निलेश मांजरे, रविकांत पाटील, अमीर शेख, मौलाली शेख, किरण पराग, नंदा कांबळे, सुरेखा पाटील, सैपन फुलारी, मिजास जागीरदार, आधी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login