सोलापूर अश्विनी रुग्णालयासमोर अचानक गर्दी….पुढे काय झाले पहा…

सोलापुरातील अश्विनी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी सकाळी अचानकपणे हलग्या आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून गेले होते…. नेमकं रुग्णाला बाहेर काय चाललं आहे हे पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी पडली… अश्विनी रुग्णालय कुंभारी या ठिकाणी रुग्णांची होणारी लूट थांबवावी , रुग्णांना माफक दरात उपचार व्हावे, अश्विनी रुग्णालयातील मेडिकल मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची लूट होत असल्याने ते मेडिकल तात्काळ बंद करण्यात यावे आणि सदरचे मेडिकल दुसऱ्या संस्थेत किंवा इसमास चालवण्यात देण्यात यावे ॲम्बुलन्स ची व्यवस्थित सुविधा करून देण्यात यावी या विविध मागणीसाठी युवा भीमसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अश्विनी कुंभारी रुग्णालयासमोर हलगी नाद आंदोलन करून रुग्णालयाचे कान उघडे करण्याचे काम केले.
युवा भीमसेनेने केलेल्या मागण्या हे खालील प्रमाणे….
1 हॉस्पिटलमध्ये स्वतःचे मेडिकल दुकान असून सदर मेडिकल मधून आवाच्या सवा दराने एमआरपीप्रमाणे औषधाची विक्री करून सर्वसामान्य नागरिकाची लूट थांबून मेडिकलचा परवाना रद्द करा. दुसऱ्या व्यक्तीस मेडिकल चालवण्यास द्यावे
2 हॉस्पिटलच्या अंबुलन्स असून त्याचा दर प्रति 25 किलो प्रमाणे व ऑक्सिजन 400 रुपये किलो प्रमाणे आकारला जातो तो देखील रुग्णाच्या नातेवाईकांना खूपच जाचक आहे म्हणून बाहेरच्या अंबुलेंसला पेशन्ट नेणास परवानेगी द्या.
3 धर्मदाय न्यास योजना योग्य पद्धतीने राबवा व तसेच ही योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये लागू झाल्यापासून आजतागायत किती रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला याची माहिती आम्हाला पत्र व्यवहारीद्वारे कळवावे.
4 आपल्या हॉस्पिटल मधील अंगरक्षक हे अरे रव्याची भाषा करून शिवीगाळ करतात हे देखील थांबवा .
5 आपल्या हॉस्पिटल मध्ये शूटिंग करण्यास मनाई केली जाते ती ही थांबवा हॉस्पिटलमध्ये जर अन्याय होत असेल तर तो अन्याय बाहेर कळणार कसा शूटिंग करण्यास परवानगी द्या .
6 धर्मादाय चारिटेबल ट्रस्ट येथे उपलब्ध खाटा पैकी दहा टक्के खाटा हे दुर्बल घटकातील लोकांना राखीव आहेत ते त्यांना मिळत नाहीत दुर्बल घटकातील राखीव असलेल्या बेडवर ऍडमिट असलेले रुग्णाची माहिती ठळक अक्षरात बोर्डावर लिहावे या सर्व मागण्यासाठी युवा भिमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या समोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले पंधरा दिवसात हे मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्रपद्धतीचं आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिले यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते



