महाराष्ट्रSolapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

तब्बल 66 लाखांचा विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू बाळगल्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूरः- अँड. रियाज एन शेख

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी 60 लाख रुपयाचा मु‌द्देमाल ट्रक मधून वाहतूक करत असताना पकडलेल्या दाखल गुन्ह्यातील वाहन मालक आरोपी नामे रफिक गफार मेमन राहणार मुक्काम पोस्ट श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या आरोपीस सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की,
दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना कर्नाटकातून वाहन क्रमांक MH40AK8673 या वाहनांमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला व सुगंधी तंबाखू घेत घेऊन जात असल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती. सदर बातमीवरून अन्न सुरक्षा अधिकारी अशोक यमनप्पा इलागेर यांनी व त्यांच्या कार्यालयामधील इतर सह कर्मचारी व अधिकारी यांनी मोहोळ रोड, कामती येथे मध्यरात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या बातमीचे वाहन आढळून तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये विमल पानमसाला व वी-1 सुगंधित तंबाखू या प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनाचे ड्रायव्हर विजय शिवानंद कंबार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सदरचा मु‌द्देमाल हा सुजित क्यूसारा यांचे असल्याचे व वाहन ट्रान्सपोर्टचे मालक रफिक मेमन असल्याचे सांगितले होते. सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये एकूण 66 लाख 16 हजार 600 रुपयांचा प्रतिबंधित विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचे मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला होता.

सदरचा मुद्देमाल अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जप्त करून ताब्यात घेऊन कामती पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपी वाहन चालक वाहन मालक व मुद्देमालाचे मालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 व इतर कलमांतर्गत तसेच अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. सदर दाखल गुन्ह्यांमध्ये पुण्यामध्ये अटक होऊ नये म्हणून आरोपी रफिक गफार मेमन यांनी अॅड. रियाज एन शेख यांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली.

प्रस्तुत प्रकरणांमध्ये आरोपीच्या वतीने युक्तिवाद करत असताना अॅड. रियाज एन शेख यांनी पकडलेला मु‌द्देमाल हा विषारी असल्याचा कोणताही पुरावा नसताना तसेच सदर मु‌द्देमाल हा वाहतूक करत असताना मिळून आल्याने सदर आरोपींच्या विरुद्ध कलम 123 हे लागूच होत नाही. तसेच सदर कलम लागू होते अथवा नाही याब‌द्दलची सुनावणी अ‌द्याप सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून इतर उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना अटकपूर्व जामीन दिलेलाच असल्याने आरोपीला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे जे मोहिते साहेब यांनी आरोपी रफिक गफार मेमन यांना रक्कम रुपये 50,000/- हजाराच्या जामीन कदब्यावर तसेच तपासकामी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर तसेच साक्षीदारांना दबाव न आणण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel