महाराष्ट्र

समृद्धीवर बस अपघाताला वेगळं वळण, 13 बळी घेणाऱ्या बसबाबत धक्कादायक माहिती समोर

विनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 02 डिसेंबर : समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून तो अपघातांमुळे सातत्याने चर्चेत आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी १५ ऑक्टोबरला टेम्पो ट्रॅव्हलर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता.

या अपघातात १३ जणांचा बळी गेला. आता या अपघातातील खासगी बसबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बसचा साटाच बनावट होता असा खुलासा झाला आहे. कालबाह्य झालेली बस मॉडीफाय करून वापरली होती.

अपघातातील बसबाबत धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता मालक आणि चालक या दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त बस कालबाह्य झाली होती. त्या बसच्या चेसिस नंबरमध्ये बदल करण्यात आला होता. अशा प्रकारे सरकारची फसवणूक केल्या प्रकरणी आता वैजापूर पोलीसांनी मालक आणि चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर बसने समृद्धी महामार्गावर ट्रकला धडक दिली होती. जांबरगाव शिवारात रस्त्यावर ट्रक उभा होता. या अपघातात 13 जण ठार तर 22 जण जखमी झाले होते. ट्रकला परिवहन विभागाच्या वाहन निरीक्षकांनी अडविल्याने तो थांबल्यानंतर हा अपघात झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी दोन मोटार वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आले होते. खासगी बसचा चालक आणि दोन परिवहन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel