सोलापूर बातमीसोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन.

१) सोमपा मधील २५ ते ३० वर्षापासून ०६/०४/१९९५ पासून बदली रोजंदारी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव मा. आयुक्त यांनी १८/०५/२०२३ रोजी मा.नगर विकास खाते (मंत्रालय) विभागकडे पुढील कार्यवाहीस पाठवलेला असून अद्याप त्यास 14 महिने उलटून गेले असून नगर विकास खाते (मंत्रालय) यांच्याकडून कसलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. तरी सोलापूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागने पाठवलेल्या 2४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा प्रस्तावमध्ये मा.आयुक्त यांनी लक्ष घालून २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

२)सोमपा मधील बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये प्रतिदिन १०० रुपये प्रमाणे वाढ करावी.

३) मनपा मधील लाड पागे आयोग सफाई सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात मा.न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करून अर्ज दाखल केलेल्या पाल्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये जेवढे प्रकरण मंजूर आहेत त्या पाल्यांना माननीय आयुक्त आपले हस्ते लाड पागे नियुक्ती पत्राचे वाटप करून पुढील नियुक्तीपत्र टपालद्वारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सुपूर्द करावे.

४) मनपातील कर्मचाऱ्यांचे ५,६ व ७ व्या वेतनातील फरक अदा करावा.
व मनपा मध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महागाई भत्ते व इतर देय भत्ते महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित पद्धतीने लागू करावे.

५) मनपातील सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा पद्धतीचे वैद्यकीय सुविधा पूर्ववत चालू करावे.

६)सोमपा मधील आरोग्य निरीक्षक यांना शासनाच्या धोरणानुसार वाहतूक भत्ता म्हणून १०० रु ऐवजी ३,००० रू वाढवून मिळावा.

७) सोमपा मधील अधिकारी व इतर कार्यरत असणाऱ्या वाहन चालक यांना ८ तासाचे काम द्यावे अशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन पत्र सादर करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, कार्याध्यक्ष योहान कानेपागुल, खजिनदार अरुण मेत्रे, प्रमुख संघटक राम चंदनशिवे, अलीम पठाण, धनाजी लोंढे,नीलम गायकवाड, बिबीशन गायकवाड,सुनील शिंदे,धोंडीबा कापुरे, बाळासाहेब शिंदे,प्रशांत गवळी, पदाधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel