सोलापूर राजकीयsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

नई जिंदगी – शांती नगर येथे 7 जणांनी जागेवर जबरदस्तीने कब्जा केला ; खरेदीखत असूनही फसवणूक व दमदाटी..!

सोलापूर, दि. ०२ सप्टेंबर –* जागेचा कायदेशीर खरेदीखत दस्त करूनही ७ जणांनी त्या जागेवर जबरदस्तीने कब्जा करून फसवणूक व दमदाटी केल्याचा प्रकार शांती नगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

*गुन्ह्याची माहिती –*

*गु.र.नं. व कलम :* ८००/२०२६ – भा.न्या.संहिता कलम ३१८, ३३१, ३३६, ३३८, ६१, ३५१, ३(५) प्रमाणे

*घटनेची वेळ व ठिकाण :* दि. १८/१२/२०२१ रोजी ते आजतागायत, शांती नगर, सोलापूर

*गुन्हा दाखल :* दि. ०२/०९/२०२६ रोजी रात्री १९.२५ वा.

*फिर्यादी :* भारत अमरसिंग मन्सावाले, रा. ७९, बाळ शिवयोगी नगर, कुमठा नाका, सोलापूर

*आरोपी :*

१) कौसर सैपन शेख

२) अब्दुल सैपन शेख

३) मुस्कान कडेचूर

४) हलामा अब्दुल शेख

५) जहराबी हनिफ कटनघर

६) वसीम खरादी

७) अनवर महिबुब शेख

*नेमके काय घडले?*

फिर्यादी भारत मन्सावाले यांनी खरेदीखत दस्त क्र. ८८१९/२०२१ अन्वये मूळ मालक विठ्ठल दशरथ गोली यांच्याकडून मौजे माजरेवाडी येथील जागा खरेदी केली होती.

सोलापूर महानगरपालिका हद्दवाढ भागातील माजरेवाडी येथील जुना सर्व्हे नं. २३/९/अ/१/ब ज्याचा नवीन सर्व्हे नं. ४४/१/अ/१/ब पैकी शांती नगर वसाहत मधील प्लॉट नं. २३०, क्षेत्र १८६.७४ चौ.मी. किंवा २०००.३२ चौ.फूट, त्यात पत्र्याचे शेड असलेली जागा त्यांनी कायदेशीररित्या खरेदी केली होती.

मात्र, आरोपींनी या जागेच्या संदर्भात फसवणूक करून, जागेवर जबरदस्तीने कब्जा केला आणि फिर्यादीस दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करीत आहेत…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel