सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूर ST स्टँड येथून सुशिला पवार यांच्या बॅगेतील 2 लाख 30 हजारांची चोरी….!

सोलापूर, दि. ०१ सप्टेंबर (माहिती कक्ष) -* सोलापूरच्या मध्यवर्ती एस.टी. स्टँडवर गर्दीचा फायदा घेत एका ५४ वर्षीय प्रवासी महिलेच्या बॅगेमधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्याची माहिती –
* *गु.र.नं. व कलम :* ६८९/२०२६ भा.न्या.संहिता कलम ३०३(२) प्रमाणे
* *घटनेची वेळ व ठिकाण :* दि. २५/०८/२०२६ रोजी रात्री ८:०० वा. एस.टी. स्टँड वरील फलाट क्रमांक ३, सोलापूर
* *फिर्यादी :* सौ. सुशिला मोतीराम पवार, वय ५४ वर्षे, रा. मु.पो. पाटील तांडा खूदावाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद (धाराशिव)

*गेला माल (एकूण २,३०,०००/- रु.) -*
* ३०,०००/- रु. – अंदाजे ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
* ६०,०००/- रु. – अंदाजे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण
* ९०,०००/- रु. – अंदाजे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र
* ५०,०००/- रु. – रोख रक्कम (विविध दराच्या भारतीय चलनी नोटा)

*हकीकत अशी -*

फिर्यादी सुशिला पवार या दि. २५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता एस.टी. स्टँडवरील फलाट क्र. ३ वर मुरूड बसमध्ये चढत असताना ही घटना घडली. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत आणि गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीने चोरून नेली.

बसमध्ये बसल्यानंतर बॅग तपासली असता दागिने आणि पैसे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत फौजदार चावडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel