सोलापूर निधन वार्ता
मौलाना गुलाम वस्तानवी यांचे निधन….

शिक्षणमहर्षी हजरत मौलाना गुलाम वस्तानवी यांचे निधन ही एक अत्यंत क्लेशदायक, हृदयद्रावक आणि अपूरणीय क्षती आहे.
त्यांच्या निधनामुळे केवळ शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी सहज भरून निघणारी नाही.
हजरत मौलाना साहेब हे जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम, अक्कलकुवा या प्रख्यात शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी केवळ अक्कलकुवा नव्हे तर देशभरात इस्लामिक आणि आधुनिक शिक्षणाचा संगम साधणाऱ्या असंख्य शैक्षणिक संस्था स्थापन केल्या.
ते बदनापूर येथील नूर हॉस्पिटलचे देखील संस्थापक होते, जिथे हजारो रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळते.
त्यांच्या दूरदृष्टीने, तळमळीने आणि ईमानी मेहनतीनेh मुस्लिम समाजाला नवचैतन्य आणि प्रगतीचा मार्ग दाखवला.