विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणी आरोपी जामीन मंजूर.

विनयभंग व ॲट्रॉसिटी प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक २४३/२०२४ अन्वये भा.द.वी कलम ३५४,४५२ तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९) चे कलम ३(१)(w)(ii),३(२)(va) प्रमाणे आरोपी आकाश अलुरे यांच्याविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी आकाश आलूरे हा फिर्यादीच्या राहत्या घरी मध्यरात्रीच्या वेळेस जाऊन फिर्यादी घरी झोपली असता तिचा मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले होते. तसेच फिर्यादीने झोपेत असताना आरोपीने तिच्या पायास स्पर्श करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न देखील केला होता .आरोपीला पाहिल्यानंतर आरोपी हा फिर्यादी सोबत गैर कृत्य केल्याचे दिसून आले. फिर्यादीने तिच्या राहत्या घराबाहेर झोपलेले मुलांना बोलवले आणि सर्वांनी मिळून आरोपीला पकडले होते. तसेच आरोपीने हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता. त्यानंतर आरोपीला अटक झाली होती. आरोपीने आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता . जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. वैभव बोंगे यांनी काम पाहिले.