महाराष्ट्रराजकीय

शिंदे-फडणवीस सरकारचे ‘डेथ वॉरंट’ निघाले -संजय राऊत

सध्या जे मुख्यमंत्री आणि त्यांचे जे 40 लोकांचे राज्य आहे. ते पुढच्या 15 दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारचे डेथ वॉरंट निघालेले आहे. फिनीश, पुष्पचक्र अर्पण करा, अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे आज 23 एप्रिलला जळगावात येत आहेत. माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणानंतर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेपूर्वीच वातावरण तापले आहे. आता राऊतांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे राऊतांचा दावा?

संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. आम्ही मात्र निकालाची वाट पाहतोय. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या 40 लोकांचे जे काही राज्य आहे, ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्या शिवाय राहणार नाही. तर मी मागे देखील एकदा म्हणालो होतो की, फेब्रुवारीपर्यंत सरकार पडेल. पण न्यायालयाचा निकालच उशिरा लागत आहे. पण हे सरकार टिकत नाही. मात्र या सरकारचा ‘डेथ वॉरंट’ निघालेलं आहे. आता सही कोणी आणि कधी करायची हे ठरले आहे.

कलगीतुरा रंगला

उद्धव ठाकरेंची आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. मात्र सभेपूर्वीच राजकारण तापले असून गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. शिंदे गटाने सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तर संजय राऊत यांनी सरकार कोसळण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login