महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरवर मोठं संकट, उद्यापासून रस्त्यावर होऊ शकतो शुकशुकाट, कारण.

त्रपती संभाजीनगर : देशभरात केंद्र सरकारच्या हिट अँड रन प्रकरणाच्या कायद्यातील तरुतुदींच्या निषेधार्थ ट्रक टँकर चालकांचा संप सुरु आहे. याचा परिणाम पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या ट्रान्सपोर्टवर देखील झाला.त्यामुळे अनेक पेट्रोल पंप हे कोरडेठाक झालेय.

परिणामी खाजगी वाहतूक कोलमडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. याचाच लोड आता एसटीवर आलाय.

बस स्थानक हाउसफुल्ल
पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यामुळे खाजगी वाहतूक सेवा कोलमडली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरातील बस स्थानक हाउसफुल्ल झाल्याचं दिसतंय. एसटीसाठी देखील आता तर उद्या दुपारपर्यंत पुरेल एवढाच डिझेलचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. संप लवकर न संपल्यास उद्यापासून बस सेवा देखील ठप्प होण्याची भीती आहे.

काय आहे हिट अँड रन कायदा?
केंद्र सरकारने गुन्ह्याबाबत नवे कायदे केले आहेत. ज्यानुसार ट्रक किंवा डंपर चालक एखाद्याला उडवून पळून गेला तर त्याला 10 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागेल. याशिवाय 7 लाख रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती.

नवीन कायद्याविरोधात ट्रकचालकांमध्ये संताप
सरकारच्या या निर्णयानंतर ट्रकचालकांमध्ये प्रचंड संताप आहे. हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागेल. याबाबत देशभरासह राज्यभरातील ट्रकचालकांकडून विरोध दर्शवला जातोय. परिणामी त्यांनी संप पुकारला आहे. यामुळेच खाजगी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel