सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईमसोलापूर क्राईम

नई जिंदगी येथील मुलीच्या हातातून 10 हजारांचा मोबाईल चोरीला..!

सोलापूर, दि. २३ – मोबाईलवर खेळत असलेल्या चिमुकलीची नजर चुकवून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना विजयनगर भाग-२ येथे घडली आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अझहर रशिद शेख (रा. ४७७/७८, विजयनगर भाग-२, मांजरेवाडी) यांची मुलगी दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास विजयनगर-२ परिसरात काळ्या रंगाच्या रेडमी १२ मोबाईलवर खेळत होती. त्याचवेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने तिची नजर चुकवून सदर मोबाईल चोरून नेला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५२/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोह/१२७ पाटील हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel