सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूरात महिला पोलिस कर्मचाऱ्यास पतीकडून रस्त्यावर मारहाण , गुन्हा दाखल..!

सरकारी कामात अडथळा आणत मारहाण; शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी!

सोलापूर : कर्तव्य बजावत असलेल्या व्यक्तीच्या पत्नीला शिवीगाळ करून त्रास देण्याच्या प्रकारावरून संतप्त झालेल्या आरोपीने सरकारी कामात अडथळा आणत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरातील वेताळ नगर परिसरात घडल्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात धनंजनी अशोक नागटिळक (वय २८, रा. यशराज नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार मनोहर पांडुरंग जवारे (वय ३३, रा. वेताळ नगर, बार्शिंग रोड, तुळजापूर, धाराशिव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता वेताळ नगर परिसरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदार कर्तव्य बजावत असताना त्यांच्या पत्नीला आरोपीने शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच शिवीगाळ करत “लवकरच खल्लास करतो” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 352, 351(2) तसेच मादक पदार्थ कायद्याच्या कलम 85(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. 112 सुरवसे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel