सोलापूर मार्केट यार्डात ७ लाखांचा विश्वासघात! चेक घेऊन कामगारच पसार; सिध्देश्वर बँकेतून पैसे काढून फरार!

सोलापूर – के.बी.सी. अॅग्रोचे तुरीचे ७ लाख रुपये काढून आणण्यासाठी चेक देऊन पाठवलेल्या विश्वासू कामगारानेच बँकेतून पैसे काढून पोबारा केल्याची खळबळजनक घटना मार्केट यार्डात घडली आहे.
याप्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४९/२०२६ भा. न्याय सं. क. ३१६ प्रमाणे फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
घटना – दि. ०१/१०/२०२६ रोजी सायं. ५.०० वा. चे सुमारास, मार्केट यार्ड, सोलापूर
तक्रार – दि. ०३/१०/२०२६ रोजी १९.१३ वा.
फिर्यादी – काशीनाथ शरणप्पा बिराजदार, वय- ४४ वर्षे, रा. हालहळ्ळी, अक्कलकोट, सोलापूर
आरोपी – नागराज रविंद्र पाटील, वय- २६ वर्षे, रा. तिर्थ, ता. दक्षिण सोलापूर
हकीकत अशी की, फिर्यादीचे प्रितम गौडा ट्रेडर्स या नावाने के.बी.सी. अॅग्रो, सोलापूर यांच्याकडील तुरीचे बिलाचे ७ लाख रुपये जमा झाले होते. ते पैसे काढून आणण्यासाठी फिर्यादीने आरोपी नागराज पाटील यास चेक दिला होता.
विश्वासाने चेक घेऊन आरोपीने सिध्देश्वर सहकारी बँक शाखा मार्केट यार्ड, सोलापूर येथील प्रितम गौडा ट्रेडर्स अकाऊंट वरुन ७ लाख रुपये काढून कुठेतरी निघून जावून फिर्यादीचा विश्वासघात केला आहे.
७ लाख रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीचा जेलरोड पोलीस शोध घेत असून पुढील तपास पोसई- येडे- ९७६३७२७५२२ हे करीत आहेत.



