सोलापूर बातमीक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापूरात कमरेला गावठी पिस्तूल लाऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक…

सोलापूर शहरातील पुना नाका ते देगाव रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेला आरोपी हा विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खून आणि गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

उफरान उर्फ पाप्या मुनीर गोलंदाज, वय २६, राहणार गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, देगाव रोड, असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला एक तरुण पिस्तूलासारखं हत्यार घेऊन पुना नाक्याकडून देगावच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पोलिस पथकाने दोन पंचांसह जानकर नगर परिसरात सापळा रचला. पहाटे सुमारे १ वाजून १० मिनिटांनी संशयित तरुण पोलिसांच्या नजरेस पडताच त्याला घेराव घालून ताब्यात घेण्यात आलं.

पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये देशी बनावटीचं गावठी पिस्तूल आढळून आलं. पिस्तूल बाळगण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचं समोर आलं.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कृष्णा गुंडू बडूरे यांच्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याने हे पिस्तूल कुठून आणलं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel