सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईम

सोलापुरात जय भवानी प्रशालेच्या मैदानावर पोलिसांची धडक कारवाई; अनेकांना घेतले ताब्यात!

सोलापूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मद्यपान आणि गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई सुरू केली आहे. जय भवानी प्रशालेच्या क्रीडांगणासह शहरातील विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येत असून, कारवाईदरम्यान अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापूर शहरातील शाळांची क्रीडांगणे, अर्बन पार्क, बगीचे, मोकळी मैदाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी काही जणांकडून बेकायदेशीरपणे मद्यपान केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, गैरवर्तन करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागांकडून पावले उचलण्यात येत आहेत.

जय भवानी प्रशाला, पुंजाल क्रीडांगण तसेच लिंगराज वल्लाळ क्रीडांगण ते हवामान खाते रस्ता या परिसरात पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे.

यापुढील काळात शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही आवश्यकतेनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणे ही सर्व नागरिकांची सामायिक संपत्ती असून, त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करू नये, कोणत्याही प्रकारचे बेजबाबदार वर्तन करू नये आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळावे, असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel