महाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर बातमी

सोलापूर विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी भरतीमध्ये शैक्षणिक गुणवत्ता व आरक्षण धोरणाचे पालन व्हावे – सिनेट सदस्य गणेश डोंगरे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये मागील शैक्षणिक वर्षात 2023-24 भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता दिसून आली. यावर्षी होणारी भरती ही गुणवत्तेनुसार व्हावी अशी मागणी आमदार प्राणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिसभा सदस्य गणेश डोंगरे यांनी कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

मागील वर्षी उच्च शैक्षणिक अहर्ता डावलून तसेच आरक्षण धोरणाला तिलांजली देत काही हितसंबंधी लोकांच्या नेमणुका करण्यात आल्या. यासाठी आम्ही सातत्याने आवाज उठविला. अधिसभेत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले.विदयापीठाने समिती नेमल्याचे समजले. परंतु अद्याप तीन महीने उलटले तरी समितीचा अहवाल आला नाही. असे असताना विद्यापीठाने 2024-25 ची सहायक प्राध्यापक कंत्राटी भरतीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अशा वेळी येणारी भरती युजीसीच्या नियमाप्रमाणे म्हणजे शैक्षणिक API निकष व मुलाखतीचे गुणांकन एकत्र करून व्हावी व उच्च शैक्षणिक गुणवत्ता व आरक्षण प्रवर्गाचे काटेकोर पालन करावे असे निवेदन सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी दिले.यावर कुलगुरू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता विद्यापीठांमध्ये जी सहाय्यक प्राध्यापक( कंत्राटी)पदासाठी भरती झाली त्यामध्ये अनिश्चितता दिसून आली होती.सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी आवाज उठवून कुलगुरू यांना मार्च 2024 मध्ये निवेदन दिले होते.त्या संबंधित चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने पाच सदस्यीय समिती नेमली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login