महाराष्ट्र

भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्याविरूध्द लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दाखल तक्रारी वरून 7 विभागातून अहवाल मागविण्याचा आदेश झाला : रविराज कदम

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान आमदार सुभाष सुरेशचंद्र देशमुख यांच्या विरुध्द तक्रारदार रविराज कदम, सोलापूर यांनी देशमुख मंत्री पदावर असताना मंत्रीपदाचा गैरवापर व गोपनियतेच्या शपयेचा भंग केलेबाबत लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली होती. लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी प्रथमदर्शनी तक्रार दाखल करून घेऊन भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याविरूध्द सचिव, महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) मंत्रालय, मुंबई यांच्याकडून अहवाल मागविण्याचा आदेश दिला होता.

त्यास अनुसरून संबंधित विभागाकडून अहवाल प्राप्त झाला असून संबंधित तक्रारीची व्याप्ती पाहता पुढील चौकशीसाठी (१) सार्वजनिक बांधकाम विभाग, (२) सहकार विभाग, (३) शालेय शिक्षण विभाग, (४) उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग, (५) उद्योग विभाग, (६) दुग्ध व्यवसाय विभाग, (७) महसुल विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांचेकडून अहवाल मागविण्याचा आदेश दिलेला आहे.यात हकीकत अशी की, सन २०१६ ते सन २०१९ या काळात सुभाष देशमुख हे मंत्री पदावर असताना मंत्रालयात होणाऱ्या निर्णयांची माहिती असल्यामुळे तसेच विद्यमान केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्जीतील व जवळचे स्नेहसंबंध असल्यामुळे महाराष्ट्र राज्यात भविष्यात कोणकोणते नवीन राष्ट्रीय महामार्ग होणार आहेत. याची अगोदरच माहिती असल्यामुळे मंत्री पद स्विकारताना घेतलेल्या गोपनियतेच्या शपथेचा भंग करून स्वतःच्या व कुटुंबाच्या आर्थिक लाभासाठी २०१६-२०१७ साली सोलापूर-सांगली, सोलापूर-अक्कलकोट, सोलापूर-उस्मानाबाद, सोलापूर-येडशी, पेडशी-धुळे, धुळे-नागपूर, सांगली-कोल्हापूर इ. हा महामार्ग कसा व कोठून होणार आहे. याची माहिती घेवून त्यांचा मुलगा रोहन सुभाष देशमुख व त्यांचे विश्वासू सहकारी राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश लक्ष्मण महागांवकर तसेच सुभाष देशमुख हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या लोकमंगल समूहातील कंपन्यांच्या नावाने बाजार भावापेक्षा कमी दराने रस्त्यालगतच्या शेतर्जामनी शेतकऱ्यांकडून विकत घेवून मंत्री पदाचा गैरवापर केला आहे. त्या जमिनीचे राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन झाल्याबर शासनाकडून नुकसान भरपाईपोटी कोट्यावधी रूपये मिळविले. त्या नंतर महामार्गासाठी संपादन होऊन राहिलेल्या जमिनी चढ्या दराने विक्री करून त्यातून देखील अधिकचा नफा मिळविला. यातूनच स्पष्ट होते की, त्यांचा जमिनी विकत घेण्याचा दृष्ट हेतू कोणता होता ते ? या गैरकृत्यामुळे जो शेतकरी वंश परंपरागत शेती करत होता, त्याच्या अडाणीपणाचा व मागसलेपणाचा फायदा घेवून खरेदीखतामध्ये जाणून बुजून एका वाक्याचा उल्लेख करण्यात आला आहे की, भविष्यामध्ये या जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून, त्याची नुकसान भरपाईची रक्कम हे लिहून घेणार यांनी घ्यावयाची आहे. यामुळे ते गरीब बिचारे शेतकरी या आधिक लाभापासून वंचित राहिले व स्वतःची शेती कवडीमोल किमतीत या धनदांडग्यांना विकून भूमिहीन झाले.याबाबत तक्रारदार यांनी लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिनांक १४/०६/२०२३ रोजी रितसर लेखी तक्रार दिल्यामुळे लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार क्रमांक LA / COM/2280/2023 (T-8) अन्वये तक्रार नोंद झाली असून पुढील कार्यवाहीसाठी लोक आयुक्त यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याविरूध्द (१) सार्वजनिक बांधकाम विभाग, (२) सहकार विभाग, (३) शालेय शिक्षण विभाग, (४) उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण विभाग, (५) उद्योग विभाग, (६) दुग्ध व्यवसाय विभाग, (७) महसुल विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून अहवाल मागविण्याचा आदेश दिला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel