सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक
परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करण्याची समता सैनिक दलाची मागणी…
सोलापूर दि.परभणीतील भीमसैनिक, भीमयोद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत बेदम मारहाण करून त्यांची हत्या करणाऱ्या जात्यंध, मनुवादी विचारसरणीच्या पोलीस अधिकारी कर्मचारी याना तात्काळ बडतर्फ करून कठोर कारवाई करावी. तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरच्यावतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले.
यावेळी समता सैनिक दलाचे जीओसी अंबादास कदम, ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर,महासचिव अनिल जगझाप, प्राचार्य वसिष्ठ सोनकांबळे, विठ्ठल थोरे, सुनील डांगे, चंद्रकांत कोळेकर, रत्नदीप कांबळे, कुणाल जानराव, विनोद जाधव, संभाजी तळभांडरेमुकुंद चंदनशिवे, दाऊत आतार, सिद्धेश्वर भुरले इत्यादी सैनिक उपस्थित होते.