सोलापूर बातमीजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

शिक्षकांचा पगार त्वरित द्या, दिव्यांग शाळा शिक्षकांची पाच महिन्यापासूनची उपासमार थांबवा बहुजन शिक्षक महासंघाचे मुख्यमंत्री यांना निवेदन…

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांच्या डिसेंम्बर महिन्याच्या वेतानासाठी निधीची त्वरित तरतूद करण्यात यावी तसेच दिव्यांग शाळातील शिक्षक व कर्मचारी यांचे गेली पाच महिन्यापासून थकलेले वेतन त्वरित देऊन त्यांची उपासमार थांबविण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना अजितदादा पवार यांना पाठवले आहे.
राज्यातील शिक्षक व कर्मचारी यांच्या वेतनासाठी महिन्याला रु ५५०० कोटी लागतात. वेतानासाठी निधी उपलब्ध नसल्याने पगार बिले ठप्प आहेत. “लाडकी बहीण” योजनेकडे निधी वळविल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. पगार वेळेवर नाही झाल्यास बॅंक कर्जाचे हप्ते, पतसंस्थेचे हप्ते ,भविष्य निर्वाह निधीचे हप्ते थकतात. शिक्षकांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचीही उपासमार होते.
तसेच दिव्यांग शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांचे वेतन पाच महिन्यापासून थकलेले आहे. त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. दिव्यांग शाळांतील शिक्षक व कर्मचारी यांची उपासमार थांबविण्यासाठी त्यांच्या वेतनासाठी निधीची तरतूद करावी.
अशा आशयाचे निवेदन महासंघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार, ना एकनाथराव शिंदे, शिक्षण मंत्री ना दादासाहेब भुसे, सामाजिक न्याय मंत्री ना संजय शिरसाट यांना तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे शिक्षण आयुक्त यांना पाठवले आहे.
तसेच सोलापूरचे जिल्हा अधिकारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांना समक्ष भेटून दिले आहे.
निवेदनावर महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर,राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रा युवराज भोसले, जिल्हा सेक्रेटरी रवी देवकर, दाऊत आतार, डॉ राजदत्त रासोलगिकर, प्रफुल्ल जानराव यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login