सोलापूर बातमी

भर पावसात अंत्यविधी; स्मशानभूमी अभावी हेडसांड,, दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना…

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर तेरा मैल येथे स्मशानभूमी अभावी भर पावसात अंतिम संस्कार करण्यासाठी हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले आहे.
मंगळवारी एका वयस्कर व्यक्तीचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यसंस्कार करत असताना अचानक आलेल्या पावसामुळे पावसातच हाल अपेष्टा सहन करत अंतिम संस्कार करण्यात आले.
बसवनगर येथे स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात. अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. बसवनगर गावात अद्याप स्मशानभूमी नाही, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
लोकप्रतिनिधींनी बसवनगर गावात तात्काळ स्मशानभूमी मंजूर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel