महाराष्ट्रराजकीय

दिव्यांगांवर अन्याय झाला तर अधिकाऱ्याच्या थोबाडीत देईन…बच्चू कडू

दिव्यांग अर्चना पारखे यांची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली…
गजानन महाराज मंदिराजवळील महानगरपालिकेच्या अतिक्रमण कार्यवाहीत ज्या दिव्यांग महिलेचे मातीची भांडी तोडफोड केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार बच्चू कडू शहरात आले होते.या दरम्यान दिव्यांग अर्चना पारखे यांची भेट घेत तिचे पुनर्वसन करून तात्काळ तिला स्वतःचा हक्काचा निवारा मिळावा याकरिता घर बांधून देण्याचा बच्चू कडू यांनी शब्द दिला. त्याचप्रमाणे तिचा उदरनिर्वाह व्हावा याकरिता लवकरच व्यवसाय निर्मित करून देणार असेही सांगितले. महानगरपालिकेकडून दिव्यांगांना देण्यात येणारे मासिक मानधन देखील सन 2024 पासून देण्यात आलेले नसल्याने महानगरपालिका आयुक्त यांच्या बंगल्यावर भेट देणार परंतु मनपा आयुक्त हे जपानला शासकीय दौऱ्यावर गेलेले असल्याने त्यांनी फोनवरून संपर्क केला असता येत्या आठ दिवसात दिव्यांगांचे मासिक मानधन त्यांच्या खात्यावर जमा करून इतर सर्व योजना तात्काळ दिव्यांगाना द्या अन्यथा हा पंधरा दिवसानंतर आयुक्ताचा समाचार घेऊ असा इशारा दिला. त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली कारवाई अफजलखानासारखी असल्याचे म्हणत अतिक्रमण अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. अर्चना पारखे यांना हक्काचे घर देईपर्यंत त्यांना रस्त्यावर न राहू देता तात्पुरते त्यांना किरायाचे घर व दर महिन्याला किराणा पोहोचणार आहे. विशेष म्हणजे काही भिक्षेकरी व इतर दिव्यांग ही उपस्थित असताना त्यांनाही संपूर्ण योजना देऊन त्यांचेही पुनर्वसन करू असे आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी केले.यावेळी प्रहारचे संपर्कप्रमुख विनोद परदेशी,शहराध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, संकेत खापर्डे, कीर्ती देशपांडे, राजेंद्र जयस्वाल, शेख वाजीद, सचिन गवई, नवनाथ सातपुते व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel