solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरात टँकरचा हैदोस ; दुचाकीला चिरडले, 2 महिलांचा जागीच करुण अंत – पती गंभीर!

सोलापूर – सोलापूर-पुणे महामार्गावरील जुना पुना नाका येथे आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला आहे. भरधाव, बेदरकार आणि निष्काळजीपणे चालवलेल्या पांढऱ्या टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत टँकरचे चाक अंगावरून गेल्याने दोन निष्पाप महिलांचा जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर नराधम टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी –

पोलीस ठाणे – फौजदार चावडी, सोलापूर
गु.र.नं. – ७७५/२०२६ – कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब) भारतीय न्याय संहिता व १८४, १३४(अ)(ब) मोटार वाहन कायदा
घटनेची वेळ – दि. १८/१०/२०२६ रोजी सकाळी १०.०० वा. जुना पुना नाका, सोलापूर
गुन्हा दाखल वेळ – दि. १८/१०/२०२६ रोजी रात्री ११.५२ वा.
फिर्यादी – गणेश दाजी चव्हाण, रा. मु.पो. चुंगी, ता. अक्कलकोट
आरोपी टँकर – पांढरा टँकर क्र. OD १६ M ३९३८ चा फरार चालक
मयत – १) अंजनी गणेश चव्हाण २) वैशाली चव्हाण (दोघी रा. अक्कलकोट)

कसा घडला थरार?

फिर्यादी गणेश चव्हाण हे आपली पत्नी अंजनी आणि चुलत वहिनी वैशाली यांच्यासह दुचाकी क्र. MH १३ ET ५४०५ वरून तुळजापूरकडे जात होते. जुना पुना नाका येथे आले असता पाठीमागून काळ बनून आलेल्या OD १६ M ३९३८ क्रमांकाच्या पांढऱ्या टँकरच्या बेमुर्वतखोर चालकाने हयगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले.

– फिर्यादी गणेश चव्हाण यांच्या चेहरा, उजवा खांदा, उजवा पाय आणि मांडीला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले.
– त्यांची पत्नी अंजनी चव्हाण हिच्या डोक्याला, तोंडाला, दोन्ही हातांना मार लागून पोटावरून टँकरचे चाक गेल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाल्या.
– वहिनी वैशाली चव्हाण हिच्या चेहरा, डोके, कान, डावा हात, उजवा हात तुटून पोटावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाल्या.

दोघींचाही मृत्यूस कारणीभूत – टँकरचे चाक पोटावरून गेल्याने दोन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा करुण अंत झाला. एकाच कुटुंबातील दोन महिलांचा अशा प्रकारे अंत झाल्याने अक्कलकोट तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात घडवूनही या मुजोर टँकर चालकाने थांबून मदत करण्याऐवजी टँकरसह भरधाव वेगात पळ काढला.

या घटने पुन्हा एकदा महामार्गावरील बेदरकार टँकर चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार टँकर चालकाचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोसई बावणे हे करीत आहेत..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel