solapurpoliceक्राईममहाराष्ट्रसोलापूर अपघातसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सुरतगाव येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, तिघे जखमी!

सोलापूर : दोन दुचाकीवरून डबल सीट जात असलेल्या चौघांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने सोलापुरातील एक दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. सोलापूर तुळजापूर महामार्गावर सुरतगाव येथे रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

अनिल सिद्राम मुद्देबिहाळ (वय २८, रा. न्यू पाच्छा पेठ सोलापूर) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तर शिवलिंग शिरुर, पंकज जाधव, संकेत राजकुमार घोडके हे गंभीर जखमी झाले आहेत.

वरील चौघे हे दुचाकीवरून रविवारी पहाटे मोटरसायकलवरून डबल सीट तुळजापूरकडून सोलापूरकडे येत असताना पहाटे सुरतगाव येथील सत्यम हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत मार लागून अनिल हे गंभीर जखमी झाले. ही खबर मिळताच १०३३ क्रमांकाच्या अॅम्बुलन्समधून शासकीय रुग्णालयात पहाटे साडेचार वाजता दाखल करण्यात आले. इतर जखमींना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान चौघे हे फुटबॉलचे खेळाडू असून ते दर्शनासाठी गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, धडक देणाऱ्या गाडीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel