PM Narendra Modi | जामा मशिदीच्या शाही इमामांना आता फक्त मोदींकडून अपेक्षा, भावनिक अपील

शाही इमामांनी इस्रायल-पॅलेस्टाइन मुद्दावर टू-स्टेट फॉर्म्युल्याच समर्थन केलं. शाही इमामांनी युद्धामधील जखमींची संख्या आणि मानवीय संकटावर चिंता व्यक्त केली. या युद्धात आतापर्यंत 21,300 पेक्षा जास्त पॅलेस्टाइन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
भारताची भूमिका काय आहे?
भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत एका मसुदा प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं होतं. इस्रायल-हमास संघर्षात तात्काळ मानवी युद्धविरामासह सर्व बंधकांची विनाअट सुटका करण्याची मागणी केली होती. इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात शांतता आणि स्थिरतेच समर्थन करण्यासाठी भारताची कटिबद्धता दिसून येते. भारताने पॅलेस्टाइनला कोट्यवधी रुपयांची मदत पाठवली आहे. त्याशिवाय गाजाच्या लोकांसाठी अन्न-पाणी आणि अन्य आवश्यक सामान पाठवलय. भारत इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात टू-स्टेट फॉर्म्युल्याच समर्थन केलय.



