महाराष्ट्र

गौतम गंभीरनंतर भाजपच्या आणखी एका खासदाराचा राजकारणाला अलविदा; मोदी व शहांचे मानले आभार

Jayant Sinha : भाजप नेते आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यानंतर भाजपच्या आणखी एका खासदाराने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

हजारी बागमधील भाजपचे खासदार जयंत सिन्हा यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे ट्वीट करत सांगितले आहे.

जयंत सिन्हा ट्वीट

शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे विनंती केली आहे. सर्व निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे, अशी विनंती जयंत सिन्हा यांनी नड्डा यांच्याकडे केली आहे. ट्विटमध्ये जयंत सिन्हा म्हणाले की, “आपल्याला भारतात आणि जगभरातील जागतिक हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काम करायचे आहे. यामुळे पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे. मी पुढेही पक्षासाठी काम करत राहील.”

 

 

 

पुढे ते म्हणाले, “मागील १० वर्षापासून आपण हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. पण आर्थिक आणि शासनासंबंधीच्या मुद्द्यावर यापुढे पक्षासोबत राहू. जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला संधी दिली त्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आणि अमित शाह यांचे आभार मानतो.” सिन्हा सध्या हजारीबाग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

यापूर्वी गौतमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक ट्विट करत, ” मी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय जबाबदारीतून मुक्त करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून मी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करू शकेन. “अशी विनंती त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याकडे केलीय. तसेच “मला जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद.’ असेही म्हटले होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login