सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ व रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा संयुक्त पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न…

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ तसेच रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा सन २०२६-२७ या वर्षासाठीचा संयुक्त पदग्रहण (Installation) सोहळा आयएमए हॉल, सोलापूर येथे अत्यंत दिमाखदार, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी रोटे. असावरी सराफ यांनी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षपदाची, तर रोटे. डॉ. विष्णू रंगरेज यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. तसेच रोटे. महेश सुधाकर यांनी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे चेअरमन म्हणून, तर रोटे. अनास्तासिया मार्टिनकोव्हा यांनी सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. जयेशभाई पटेल हे प्रमुख पाहुणे, डीएलए (PDG) डॉ. दीपक पोफळे हे प्रमुख अतिथी तसेच असिस्टंट गव्हर्नर रोटे. महेश साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रोटरीच्या “Create Lasting Impact” या वार्षिक संकल्पनेनुसार समाजहिताची प्रभावी सेवा करण्याचे आवाहन केले.
नवनिर्वाचित अध्यक्षा रोटे. असावरी सराफ यांनी आगामी वर्षासाठीचे सेवा प्रकल्प, सदस्यवृद्धी, महिला व युवक सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रमांचे व्हिजन सादर केले. तर सॅटेलाईट क्लबचे चेअरमन रोटे. महेश सुधाकर यांनी सॅटेलाईट क्लबच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण व परिणामकारक सेवा प्रकल्प राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. नमिता वडापूरकर यांनी अत्यंत प्रभावी व नेटके केले. कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या सादरीकरणासाठी (PPT) रोटे. बसवराज रोड ट्रॅक्टर यांनी मोलाचे सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी उत्कृष्टरीत्या पार पडली. उपस्थित मान्यवर, रोटेरियन्स व पाहुण्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. या पदग्रहण सोहळ्याने दोन्ही क्लबच्या नव्या रोटरी वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली असून, “Service Above Self” या रोटरीच्या ब्रीदवाक्यानुसार समाजहितासाठी अधिक प्रभावी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia