सोलापूर अपघातमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापूर हादरलं! विजापूर रोडवर भीषण अपघात; तरुणाचा जागीच अंत

सोलापूर विजापूर रोडवर एसआरपी कॅम जवळ दुचाकी आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात एका ,22 वर्षे तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना समोर आली आहे.

हा अपघात आज दिनांक 06 जुलै 2026 रोजी दुपारच्या सुमारास घडला.

निसार जावेद मुल्ला वय वर्ष 22 राहणार झोपडपट्टी नंबर दोन विजापूर नाका सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे तर सोबत असलेला त्याचा मित्र तबरेज जमीर यादगिरी वय 23 वर्षे हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारच्या सुमारास सोलापूर विजापूर रोडवर दुचाकी ने जात असताना एस आर पी कॅप जवळ मकानदार हॉटेल समोर बाजूने जाणाऱ्या टेम्पो ने कट मारल्याने दुसाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी हे रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या कारला पाठीमागून जाऊन धडकली.

घटनेनंतर दोघांना तात्काळ सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच निसार मुल्ला याचा मृत्यू झाला.
निसार हा अविवाहित होता त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे.
अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel