सोलापूर: लग्नानंतर 2 महिन्यांतच सासरचा छळ; टीव्ही, एसी, कारसाठी हुंडा मागून मारहाण, पती-सासूसह 3 जणांवर गुन्हा…

सोलापूर – लग्नानंतर केवळ 2 महिन्यांतच सासरी मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहितेने तक्रार दिली आहे. टीव्ही, एसी आणि चारचाकी गाडी घेण्यासाठी सतत हुंड्याची मागणी करत शिवीगाळ आणि मारहाण केल्याने पती, सासू आणि नणंदेविरुद्ध सलगार वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. पिंकी किरण पवार, वय 22 वर्षे, सध्या रा. रुम नं. 705, बालाजी ऑरचीड सोसायटी, चांभारली, ता. खालापूर, जि. रायगड, सध्या वास्तव्य सी 45, शहा नगर, तपस्या कोल्ड कॉर्नर जवळ, सोलापूर यांनी तक्रार दिली आहे.
हकीकत अशी की, दि. 08/08/2025 ते दि. 28/04/2026 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील चांभारली येथील सासरी असताना आरोपीतांनी मिळून फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास दिला. आरोपीत 1) किरण पवार – पती, 2) अनिता पवार – सासू, 3) प्रियंका उमेश राठोड – नणंद, रा. रुम नं. 705, बालाजी ऑरचीड सोसायटी, चांभारली, ता. खालापूर, जि. रायगड यांनी मिळून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
टीव्ही, एसी आणि चारचाकी वाहन घेण्यासाठी सतत पैशांची मागणी करून त्रास दिला. यामुळे वैतागून फिर्यादीने सोलापूर येथे राहायला सुरुवात केली आणि कायदेशीर तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दि. 06/07/2026 रोजी सकाळी 11:17 वाजता सलगार वस्ती पोलीस ठाण्यात गु.र.नं. 223/2026 भा.न्याय संहिता कलम 85 हुंडा मागणी, 115(2) दुखापत, 352 जाणूनबुजून अपमान, 351(2) धमकी, 3(5) सामूहिक गुन्हा प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.
पुढील तपास पो.कॉं/ 754 कुंभार – 9823629748 हे करत आहेत.



