राजकीय
नितेश राणेंनी वराह धरून धरून आणावे स्वतःच्या घरात पूजा करावी;आ.अमोल मिटकरी

सोलापूर:महाराष्ट्र सरकारमधील मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे एक मागणी केली आहे. भाद्रपद शुद्ध द्वितीया 25 ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी गुरुवारी सोलापूर मध्ये असताना नितेश राणेंवर टीका केली आहे.महाराष्ट्र राज्यात शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे संकटात सापडला आहे.शेतकरी आत्महत्या होत आहेत,त्यावर उपाययोजना करण्याऐवजी वराह जयंतीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.अशा संतप्त स्वरूपात प्रतिक्रिया दिली आहे.



