सोलापूर- घराचे बांधकामावरून वाद – वडिलांच्या डोक्यात वीट मारून जखमी, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

सोलापूर : घराचे बांधकाम चालू असताना इलेक्ट्रिशियनच्या कामावरून वाद घालून शिवीगाळ करून विटेने मारहाण करून जखमी केल्याची घटना भुषण नगर येथे घडली असून सलगरवस्ती पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सलगरवस्ती पोलीस ठाणे – गु.र.नं. ३०८/२०२६
भा न्याय सं कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे
गु.घ. ता. वेळ/ठि. :- दि. ०१/११/२०२६ रोजी १८.३० वा चे सुमारास भुषण नगर सोलापूर
गु.दा. ता. वेळ :- दि. ०२/११/२०२६ रोजी १९.२६ वा.
फिर्यादीचे नाव :- मंगल दिलीप लकडे वय-५५ वर्षे, रा-११५७ दोन नंबर झोपडपट्टी सोलापूर
आरोपीचे नाव :- १) चनप्पा गुरप्पा ओटगी २) सुधा चनप्पा ओटगी ३) मल्लिकार्जुन ओटगी ४) गुरुराज ओटगी रा-भुषण नगर सोलापूर
हकीकत अशी की –
यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील आरोपीचे घराचे बांधकाम चालू असून इलेक्ट्रिशनचे काम करणारे टेळे यांना फिर्यादीचे वडीलांनी आमचे घराचे काम करायचे असून तुम्ही बघा असे म्हणाले असता आरोपी क्र ३ याने तुम्ही आमचे घरी आलेल्या लोकांना का बोलता म्हणून वडीलांना व बहिणीला शिवीगाळ करून विटेने वडीलांचे डोकीस मारल्याने चार टाके पडलेले आहे तसेच आरोपी क्र १ ते ४ यांनी फिर्यादीस दमदाटी करून शिवीगाळ केली व वडीलांचे शेजारी राहणारे अन्नपूर्णा लेंगरे यांना आरोपी क्र २ हिने हाताने मारहाण करून शिवीगाळ केली आहे म्हणून.
तपास :- पोह/७५४/कुंभार हे करीत आहेत.

