सोलापुरात गुटखा विक्रेत्यावर कारवाई – पानशॉपमध्ये 7650 रुपयांचा सुगंधीत तंबाखू, ओला मावा जप्त!

सोलापूर : राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधीत तंबाखू, ओला मावा यांसारख्या घातक पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्या एका पानशॉप चालकावर जोडभावी पेठ पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. यात ७ हजार ६५० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाणे – गु.र.नं. ८१०/२०२६
भा. न्या. सं. क. २२३, २७४, २७५, १२३, ३(५) व अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम २६(२)(i), २६(२)(ii), ३१(३)(e), ३०(२)(a) सह अन्न सु. मा. कायदा ५९ प्रमाणे गुन्हा.
गु.घ. ता. वेळ / ठि. :- दि. २७/१०/२०२६ रोजी ११.४० वा. जुना तुळजापूर नाका सोलापूर
गु.दा. ता. वेळ :- दि. २७/१०/२०२६ रोजी
फिर्यादी :- देशमुख, नेम-अन्न व औषध सुरक्षा प्रशासन सोलापूर
आरोपी :- १) निखील राजू कांबळे, रा. सोलापूर
जप्त माल :- ७,६५०/- रु चे सुगंधीत तंबाखू व ओला मावा
हकीकत अशी की –
वरील वेळी व ठिकाणी, यातील आरोपीने त्याचे ताब्यातील पानशॉप मधून मा. अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी दिलेले अधिसूचना क्र. असुमाआ/अधिसूचना/८६/२०२६/७ दि. १३/०७/२०२६ अन्वये जारी केलेल्या प्रतिबंधक पदार्थांची विक्री करून नमूद कलमान्वये भंग केला व शिक्षेस पात्र आहे म्हणून.
राज्यात बंदी असतानाही तरुण पिढीला व्यसनाच्या खाईत लोटणाऱ्या या प्रतिबंधित गुटखा-मावा विक्रीवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे.
तपास :- सपोनि महाडिक – ९६२३७३८१०५ हे करीत आहेत.



