महाराष्ट्र

सोलापूर – मार्कंडेय रुग्णालयातून पेशंटचे 65 हजारांचे 2 मोबाईल लंपास!

सोलापूर : शहरातील मार्कंडेय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पेशंटचे दोन महागडे मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली असून जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जेलरोड पोलीस ठाणे – गु.र.नं. ५८६/२०२६
भा. न्या. सं. कलम ३०५(अ) प्रमाणे गुन्हा.

गु.घ. ता. वेळ / ठि. :- दि. १९/१०/२०२६ ते दि. २०/१०/२०२६ रोजी पर्यंत ३२३ मार्कंडेय रुग्णालय सोलापूर
गु.दा. ता. वेळ :- दि. २७/१०/२०२६ रोजी १८.५६ वा.

फिर्यादीचे नाव :- विठ्ठल सोमसिंग नरोटे, रा. मु.पो. कुंभारी ता. दक्षिण सोलापूर
आरोपीचे नाव :- अज्ञात चोरटा
गेला माल :- ६५,०००/- रु एक ओप्पो पांढरे रंगाचा मोबाईल, सॅमसंग केशरी रंगाचा मोबाईल

हकीकत अशी की –

वरील वेळी व ठिकाणी, मार्कंडेय रुग्णालयातील पेशंट नामे सविता महादेव लंगोटे यांचे वरील ठिकाणावरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने वरील वर्णनाचा व किमतीचा मोबाईल हा मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहे म्हणून.

रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणीही चोरी होत असेल तर सर्वसामान्य रुग्णांनी सुरक्षित कसे रहायचे असा सवाल उपस्थित होत आहे.

तपास :- पोकॉ/ १३१९/बाबर –  हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel