सोलापूरात कारची दुचाकीला धडक – दोन चिमुकल्यांसह पिता जखमी, गुन्हा दाखल

सोलापूर : कराटे क्लासहून दोन मुलींना घेवून घरी जात असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने पिता व मुलगी जखमी झाल्याची घटना रेल्वे स्टेशन परिसरात घडली असून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फौजदार चावडी पोलीस ठाणे – गु.र.नं. ८०६/२०२६
भा न्याय सं कलम २८१, १२५(अ), मोवाकाक १८४ प्रमाणे
गु.घ. ता. वेळ/ठि. :- दि. २६/१०/२०२६ रोजी २०.१५ वा. रेल्वे स्टेशन जवळ सोलापूर
गु.दा. ता. वेळ :- दि. ०२/११/२०२६ रोजी १७.४७ वा.
फिर्यादीचे नाव :- उदयकुमार चनप्पा बिराजदार, रा-उत्तर कसबा सोलापूर
आरोपीचे नाव :- दादापीर नबीलाल शेख रा भवानी पेठ सोलापूर
हकीकत अशी की –
यात हकिकत अशी की, वरील वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी हे दुचाकी क्र एमएच १३ ई वाय १६८७ यावरून विवेक पाटील याची मुली विवा व विहाना यांना रूद्र अकॅडमी येथे कराटे क्लास येथून घेवून घरी जात असताना नमुद ठिकाणी गुंड यांचे किराणा दुकानाजवळ आले असता यातील नमुद आरोपीने त्याचे ताब्यातील कार क्र एमएच १३ एसी ८१०२ ही भरधाव वेगाने चालवून फिर्यादीचे दुचाकीस डावे बाजूला धडक दिल्याने त्यात फिर्यादी व मुलगी विवा यांना जखमी होणेस कारणीभूत झाला आहे म्हणून.
तपास :- पोहेकॉ/ ३०३/गौडनवर हे करीत आहेत.

