सोलापुरात मिक्सर दुरुस्तीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

सोलापूर : सोलापूर शहरात मिक्सर दुरुस्तीच्या कारणावरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी दुपारी तीनच्या सुमारास पीडित मुलगी मिक्सरचे भांडे दुरुस्त करण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी आरोपी अंकुश परमात्मा आनंदकर (वय २५, रा. सोलापूर) याने तिला घरी बोलावून घेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
धमकी देऊन पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप
या घटनेनंतर सुमारे १५ दिवसांनी आरोपीने पीडित मुलीला पुन्हा घरी बोलावले. दुपारी एकच्या सुमारास तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित मुलीने घडलेला प्रकार उघड केल्यानंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, आरोपी अंकुश आनंदकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.



