सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर राजकीय

खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; मोहोळ–वळसंग मार्गाच्या 740 कोटींच्या उन्नतीकरणाला मंजुरी…

सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची पायाभूत सुविधा उभारणीची प्रक्रिया आता गती घेणार आहे. राष्ट्रीय महामार्ग 465 अंतर्गत मोहोळ–कुरुल–कामती–तेरा मैल–बसवनगर–औराद–बंकलगी–वळसंग या मार्गाच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या रस्त्याचे 2/4 पदरीकरण पेव्ड शोल्डरसह करण्यात येणार असून, एकूण 81.37 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पासाठी सुमारे 740.38 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रस्त्याच्या उन्नतीकरणाची मागणी वेळोवेळी मांडली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय स्टँडिंग फायनान्स कमिटीने या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.

या उन्नतीकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागांमधील दळणवळण सुधारेल, तसेच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सध्या अरुंद आणि काही ठिकाणी धोकादायक असलेला हा मार्ग रुंद आणि आधुनिक बनवण्यात येणार असल्याने प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होईल.

याशिवाय, या प्रकल्पाचा थेट फायदा व्यापार, उद्योग आणि शेती क्षेत्राला होणार आहे. शेतमाल वाहतुकीस गती मिळेल, उद्योगांना लॉजिस्टिकची सुविधा सुधारेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे या प्रकल्पाकडे सोलापूरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत, लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia