सोलापूर शिवसेना प्रमुख मनीष काळजे यांच्या जामीनावर न्यायालयाचा निर्णय काय पहा…

पोलिसांशी धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यासह एकास अटकपूर्व जामीन मंजूर.
सोलापूर दि- पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष अजयकुमार काळजे व वेणू श्रीनिवास कोंकत्ती दोघे रा. सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की दि:- 4-9-2025 रोजी शिवसेना भवन सात रस्ता सोलापूर येथे गणेश विसर्जनाच्या स्वागत करण्यासाठी बेकायदेशीर स्टेज उभा करण्यात आला होता. सदरच्या स्टेजला परवानगी नाकारण्यात आली असताना मनीष काळजे व त्याचे साथीदारांनी स्टेज उभा केला होता सदर बाबत पोलिसांनी स्टेज काढण्याबाबतची समज मनीष काळजे व त्यांच्या साथीदारांना दिली होती परंतु त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्याच्या मध्ये बसून वाहतुकीस अडथळा निर्माण केला .पोलिसांनी निघून जाण्याबाबत आव्हान केले तरी जमाव पांगला नाही तसेच मनीष काळजे व त्याच्या साथीदारांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली व सरकारी कामात अडथळा आणण्याची फिर्याद पो. ह. बाळू सूर्यकांत जाधव यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून मनीष काळजी यांनी ॲड मिलिंद थोबडे यांचे मार्फत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी अर्जदार आरोपीचे वकील ॲड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात, फिर्यादीचे अवलोकन केले असता सकृतदर्शनी हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला असे म्हणता येणार नाही, त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सादर केला, त्यावरून न्यायाधीशांनी 50,000/-रुपयाच्या जातमूचलक्यावर सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान 30 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. राम कदम तर सरकारतर्फे ॲड. शितल डोके यांनी काम पाहिले.



