solapurpoliceसोलापूर क्राईमसोलापूर धार्मिकसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

धोत्रे येथील पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांची संवाद बैठक

आज दिनांक 27/06/2026 रोजी मौजे धोत्रे, ता. दक्षिण सोलापूर येथे मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “पहाट” उपक्रमांतर्गत पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष संवाद व बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पारधी समाजातील सुमारे 70 ते 80 नागरिक, महिला, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या.

बैठकीदरम्यान त्यांनी पारधी समाजातील सर्व पालकांना आपल्या मुलांना नियमित शिक्षण देण्याचे आवाहन केले. शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून प्रत्येक मुलाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन, कांडप (पीठ गिरणी) मशीन तसेच अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या, रोजगारनिर्मिती, आरोग्य सुविधा आणि मूलभूत गरजांबाबत उपस्थित नागरिकांशी सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदर बैठकीस गावातील शेतकरी, सरपंच, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

बैठकीची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक, वळसंग पोलीस ठाणे श्री राहुल डोंगरे यांनी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री रविराज कांबळे तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार असून, समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found