सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

आनंद दिघेच्या नावावर रिक्षाचालकांच कल्याणकारी मंडळ म्हणजे फसवणूक मंडळ…

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रिक्षा चालकांचा सवाल...

सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.प्रशासनाने आनंद दिघेच्या नावाने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले.मात्र हे रिक्षा कल्याणकारी मंडळ फसवणूक करणारे कल्याणकारी मंडळ आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिली आहे.आनंद दिघेच्या नावाने सुरू झालेल्या कल्याणकारी मंडळात सरकार फक्त 50 कोटी देणार आणि रिक्षा चालकांना कडून 1500 कोटी जमा करणार ,ही सरळ सरळ फसवणूक आहे.सरकार रिक्षा चालकांची रक्कम वापरणार असे रिक्षा चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

*सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्षात निवृत्त रिक्षा चालकांना 65 वर्ष का कुठला न्याय-
राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्षांत निवृत्त करते.निवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते मात्र रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळाकडून असे लाभ दिले जात नाही.उलट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 65 वर्षांनंतर रिक्षा चालकांना एकदाच सन्मान निधी म्हणूंन 10 हजार रुपये दिले जाणार आहे.वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी व रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया देताना,सांगितले,आम्हाला सन्मान निधी नको तर निवृत्ती वेतन पाहिजे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान निधीचा निर्णय मागे घेऊन निवृत्तीवेतनाची घोषणा करावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login