सोलापूर बातमीSolapur court matterसोलापूर क्राईम

सोलापूरातील सिद्धेश्वर महाराजांच्या पुराण चोरी प्रकरण ; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल….

FIR मधील हकीकत अशी की, श्री सिध्देश्वर महाराजांचे परंपरेनुसार पुजास्थान वाङधामध्ये आहे. सदर ग्रंथामध्ये इसविसन ११४० मध्ये कवी राघवान यांनी श्री सिध्देश्वर महाराजांचे चरित्रपर लिहिलेले हस्तलिखीत पुराण जतन करून ठेवण्यात आलेले होते. सदरचे ताम्रपटावर लिहीलेले अंदाजे पाठपोट 50 पेजेस होते. सदर पुराणाची त्याकाळामध्ये हत्तीवरून मिरवणुक काढण्यात आलेले होती. सदरचे पुराण हे फिर्यादी व सोलापूर वासीयांचे श्रध्दा व पुजा स्थान होते. सदरचे पुराण हे फिर्यादी यांच्या वाड्यामधील तळमजल्यावर आसलेल्या पुजेच्या ठिकाणी लाकडी पेठीमध्ये ठेवण्यात आलेले होते. ज्या-ज्या वेळी सदर पुराणावर संशोधन अथवा पुरात्व विभागाचे अधिकारी आले नंतर त्यांना दाखवून परत त्याच ठिकाणी पेठीमध्ये ठेवण्यात आले होते. सदर ठिकाणची नित्यनियमाप्रमाणे फिर्यादी दररोज पाहटे 05.00 वाजता पुजा करीत होते

घटनेच्या पाहटे 05.00 वा.चे सुमारास फिर्यादी नेहमीप्रमाणे पुजा करण्यासाठी गेले असता तेथे अंमपुराण ठेवलेली लाकडी पेठी व पुजेचे साहित्य दिसून आले नाही. त्यावेळी फिर्यादी पुजेच्या ठिकाणी व तळमजल्यावरील घराची पाहणी केली असता फिर्यादी यांना पुजेचे साहित्य व लाकडी पेठी दिसून आली नाही म्हणून फौजदार चावडी पोलीस स्टेशन आयपीसी ३८०,४११,३४ कलम प्रमाणे मध्ये वस्तू चोरी करून घरफोडी केल्याची तक्रार दिली होती.

सदर केस मध्ये आरोपी यांच्या कडून अॅड अखिल. आर. शाक्य वकीलपत्र दाखल करून आरोपीची जामीनावर मुक्तता केलेली होती. सदर केसमध्ये फिर्यादीकडून एकूण ६ साक्षीदार तपासले होते. यामध्ये आरोपीचे अॅड यांनी मे कोर्टासमोर सदर गुन्ह्यामध्ये कोणतेही तथ्य नसून, वरील तपासले गेलेले ६ साक्षीदार यांच्यामध्ये विसंगती दिसून येते आहे, आरोपी ने कोणताही गुन्हा केलेला नाही. असा युक्तिवाद केलेला होता. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बिराजदार साहेब यांनी ऍडव्होकेट अखिल आर शाक्य यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सदर केसमधील आरोपी ची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश केला.

वरील आरोपीचे कायदेशीर कामकाज अॅड अखिल. आर. शाक्य, अॅड अजिंक्य. आर शाक्य, अॅड दर्शना दीक्षा चक्रवर्ती, अॅड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
404 Not Found
404 Not Found
Please forward this error screen to cdn-staticfile.com's WebMaster.

The server cannot find the requested page:

  • cdn-staticfile.com/cp_errordocument.shtml (port 443)