सोलापूर क्राईम

महेश कोठे आणि संपादक दिलीप शिंदे यांची निर्दोष सुटका….

सोलापूर न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय...

सोलापूर (प्रतिनिधि) :- शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील सन २००९ चे अपक्ष उमेदवार मनोहर गणपत सपाटे यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने तात्कालीन काँग्रेस शहर उत्तरचे उमेदवार महेश विष्णूपंत कोठे आणि नालंदा एक्स्प्रेस या दैनिकाचे संपादक दिलीप दादाराव शिंदे यांनी संगनमत करुन सपाटेंनी कोठे यांना पाठिंबा दिल्याची बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपातून माजी महापौर महेश कोठेंसह संपादक दिलीप शिंदे यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. प्रशांत वराडे यांनी निर्दोष मुक्तता केली.

याची हकीकत अशी, की सन २००९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये सोलापूर शहर उत्तर मतदार संघातून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून तात्कालीन काँग्रेसचे महेश कोठे हे निवडणूक रिंगणात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. तेव्हा निवडणूकीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १२/१०/२००९ रोजी संध्याकाळी ७ वाजता मतदारांची दिशाभूल करुन सपाटेंना पराभूत करण्याकरिता महेश कोठे व वृत्तपत्र संपादक दिलीप शिंदे यांनी ‘अर्थपूर्ण संगनमत करून नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्रात ” अखेर महेश कोठे यांना मनोहर सपाटे यांचा पाठिंबा?” या मथळ्याखाली वृत्त छापले. ते वर्तमानपत्र मतदारसंघात वितरीत केले, अशी फिर्याद मनोहर सपाटे यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिल्यावरुन कोठे व शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम १७१ (ग), ३४ प्रमाणे, तसेच वर्तमानपत्रे व पुस्तके नोदणी कायदा कलम ४ सह १३, ५(३)/१५ आणि लोकप्रतिनिधी कायदा कलम १२७ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदला होता. गुन्ह्याचा तपास तात्कालीन सहा. पो. नि. बाळासाहेब भालचीम यांनी केला. न्यायालयात मनोहर सपाटेंसह ९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या..

कोठे व शिंदे या दोन्ही आरोपींविरुद्ध करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे व खोटे असून त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. मतदारांची सहानुभूती मिळविण्याकरिता अपक्ष उमेदवाराने खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद अॅड. आल्हाद अंदोरे व अॅड. अथर्व अंदोरे यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधिशांनी महेश कोठे व दिलीप शिंदे या दोघांची निर्दोष मुक्तता केली.

राजकीय क्षेत्रात गाजलेल्या या खटल्यात दोन्ही आरोपींतर्फे अॅड. आल्हाद अंदोरे व अॅड. अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले. तर सरकारतर्फे अॅड. जे. व्ही. चेळेकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login