सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर धार्मिकसोलापूर सामाजिक

मुलींच वय वाढतय, तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका : भारत वाघमारे

चर्मकार समाज विकास मंडळाच्या मेळाव्यात ४५० वधू-वरांची नोंदणी

अनेक समाजात मुलींचे प्रमाण कमी असताना आहे त्या मुलींचे विवाह थांबले आहेत. त्यांचे वय वाढत आहे. याला पालकांच्या अपेक्षांचं ओझं जबाबदार आहे. यापुढे तिच्या डोक्यात अपेक्षा भरवू नका, तडजोडीचा मार्ग अवलंबून पुढचे आयुष्य सुखी करा, अशी अपेक्षा रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी व्यक्त केली.
चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या वधू-वर परिचय संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलताना उपजिल्हाधिकारी वाघमारे यांनी वरील अपेक्षा व्यक्त केली. जामगोंडी लॉन्स येथे रविवारी पार पडलेल्या वधू-वर मेळाव्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, शुभांगी माने, पूर्वा वाघमारे, पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक हरीदास टाणपे, नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, पाकणी आश्रम शाळेचे संचालक दत्तात्रय शिंदे, प्रमुख निमंत्रक राजशेखर जेऊरकर, मल्हारी बनसोडे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल अंगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
संत रोहिदास, संत हरळय्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. या मेळाव्यात जवळपास ४५० वधू-वर यांची नोंदणी झाली. अतिथींच्या मनोगत कार्यक्रमानंतर हजर असलेले इच्छुक वधू-वर, पालक यांनी परिचय करून देत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. प्रारंभी प्रास्ताविकेतून राजशेखर जेऊरकर यांनी यंदा वधू-वर संमेलनाचे दुसरे वर्ष असल्याचे सांगत संमेलनामागचा हेतू विषद केला. यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी संत रोहिदासांच्या विचारावर चाला, बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करा असे सांगत वधू-वर चौकशी करताना संपत्ती नको तर मुला, मुलीचे संस्कार पाहा असा आग्रह धरला.
यावेळी भारत वाघमारे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना अ, ब, क, ड वर्गीकरणाला आक्षेप नोंदवण्याचे सांगितले. या संमेलनासाठी परशुराम शिंदे, रेवणसिद्ध व्हनमराठे, वामन धुळराव, शिवपूत्र हरवाळकर, अंबादास वाघमारे, दत्तात्रय हरवाळकर, शावरप्पा वाघमारे, प्रा. आंबादास चाबुकस्वार, राजेंद्र व्हनकोरे, शिवकुमार तोळणुरे, महादेव कांबळे, संगीता शिंदे, पौर्णिमा धुळराव, सुनिता वनस्कर, सुजाता हरवाळकर, रुपाली बनसोडे, ज्योती बनसोडे़, ज्योती कांबळे, यल्लप्पा व्हनहुवे, यांच्यासह चर्मकार समाज विकास मंडळाच्या पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.

रोहिदासांचे विचार घरा-घरापर्यंत
पोहोचवा : माधव गायकवाड

यावेळी प्रमुख अतिथी माधव गायकवाड यांनी १३ व्या शतकात संत रोहिदासांनी सर्वप्रथम सथी प्रथेला विरोध केल्याचे सांगत स्त्रीयांना सन्मान दिला, त्यांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवा अशी अपेक्षा व्यक्त केली. चर्मकार समाजाची दशा आणि दिशा विषयावर ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर आज समाजाची दशा वाईट असती. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे. ते मुलांना पाजा. शासकीय सेवेत असताना आपण समाजासाठी किती उपयोगी येतोय विचार करा, महिन्यातला एक रविवार समाजकार्यासाठी द्या, असे आवाहन त्यांनी केले.

चर्मकार समाज विकास मंडळाच्या वधू-वर मेळाव्याचे उदघाटन करताना माधव गायकवाड. यावेळी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, राजशेखर जेऊरकर, मल्हारी बनसोडे, सुनील माने, विठ्ठल अंगुले, हरीदास टाेणपे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login